जलसमाधी आंदोलन करताना आंदोलकाची नदीत उडी…

जलसमाधी आंदोलन करताना आंदोलकाची नदीत उडी…
जीडी रोकडे खामगाव प्रतिनिधी
पुनर्वसन व अन्य पूरक मागण्याकडे जीवगांव प्रकल्प व्यवस्थापन आणि यंत्रणाच्या दुर्लक्षाच्या निशेधार्थ आणि आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पां नजीक पूर्णा नदीवर आडोळ खुर्द येथील येथील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. यावेळी एका संतप्त युवकाने पूर्णा नदीत उडी घेतली होती. पूर्णा नदीच्या जोरदार जलप्रवाहात ते वाहून गेले होते. यावेळी उपस्थित पोलीस व अन्य कोणीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही काल रात्री उशिरापर्यंत त्यांचा आपत्ती बचाव शोध पथकाने गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा शोध लागला नाही. स्वतंत्र दिनाच्या शुभमुहूर्तावर जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना शुक्रवारी दुपारी हा थरारक आणि तितकाच दुर्दैवी घटनाक्रम घडला. दरम्यान आज शनिवारी 16 ऑगस्ट रोजी जिल्हा आपत्ती कक्षाच्या दोन पथकाकडून बेपत्ता आंदोलनाचा युद्ध पातळीवर शोध घेण्यास प्रारंभ झाला होता. परंतु त्यांचा शोध लागला नव्हता. शेवटी30 तासानंतर त्यांचा रविवारीधुपेश्वर नदीत त्यांचा शोध लागलाआहे. आंदोलकाचे नाव विनोद पवार वय 45 वर्ष राहणार गौलखेड यांनी पूर्णा नदीच्या पात्रात उडी घेतली होती. दरम्यान जिगाव प्रकल्प व्यवस्थापन संबंधित यंत्रणा यांच्या दुर्लक्षाचा हा बळी असल्याचा आरोप गावाकडे होत आहे . गावकऱ्यांच्या डोळ्यासमोर आंदोलक वाहून गेला त्यामुळे जिल्हा प्रशासन व जिगांव प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणा हादरल्या आहे…✒️



