नांदुरा तालुक्यातील अवधा बुद्रुक येथे हजारो ब्रास रेती चोरी

नांदुरा तालुक्यातील अवधा बुद्रुक येथे हजारो ब्रास रेती चोरी
नांदुरा/बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी सौ,सरला ससाणे
अँकर,नांदुरा तालुक्यातील अवधा बुद्रुक येथील ज्ञान गंगेच्या पात्रातून दररोज हजारो ब्रास रेतीची रात्रंदिवस चोरी होत आहे चोरी करणारे ट्रॅक्टर वाहन गावातील व बाहेर गावातील गाड्यांना गावातील गावगुंड व मागील काळात रेती चोर हे बाहेरील रेती चोर गुंडांना बोलावून घेतात व गावातील कोणत्याही सामान्य नागरिकांनी हटकले असता हे बाहेरील रेती माफिया सामान्य नागरिकांना व ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांना खुलेआम जीवे मारण्याच्या धमक्या देतात हे सगळे अवधा येथील रेती चोर व गावगुंड बाहेरील गावातील रेतीमाफीया यांना गावांमध्ये बोलावतात आणि त्यांच्याबरोबर त्यांचे स्वतःचे पण ट्रॅक्टर नी हजारो ब्रास रेतीची चोरी करत असतात नांदुरा तहसील व नांदुरा पोलीस स्टेशन यांच्याशी फोन द्वारे संपर्क केला असता हे कर्मचारी संपूर्ण वाहने नदीच्या बाहेर गेल्यावर स्पॉट पंचनामा करण्यासाठी येतात आणि सांगतात आम्ही आलतो आम्हाला कोणी भेटलेच नाही हेच कर्मचारी त्यांना फोन द्वारे माहिती कळवितात असा माझा थेट नांदुरा तहसील कर्मचाऱ्यांवर आरोप आहे व अवधा येथील काही गावकरी नदीमधील सरकारी हद्दीतील रेती या बाहेर गावातील रेतीमाफी यांना खुल्या विकत आहे असे सामान्य नागरिकांमधून आवाज येत आहे ,
जळगाव उन्नती न्युज करीता सौ सरला ससाणे ची बातमी



