जऊळका पोलीस कुंभकर्णी झोपेत. मात्र वाशिम गुन्हे शाखेकडून जुगारावर मोठी कारवाई.2,99,510 रुपयाचा मुद्देमाल जप्त

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील दि. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी वाशिम गुन्हेशाखेकडून धडाकेबाज कारवाई करत २,९९,५१० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. सविस्तर वृत्त असे की, अमानवाडी ते कवरदरी रोड वर असलेल्या एका टिनशेड मध्ये बावनपानी पत्त्याचा जुगार सुरु असल्याची गोपनिय माहिती वाशिम स्थानिक गुन्हेशाखेला मिळाली त्यानुसार गुन्हेशाखेकडून जुगार अड्ड्यावर रेड टाकत पाच आरोपींना गुन्हेशाखेकडून ताब्यात घेण्यात आले. विशेष बाब म्हणजे ही कारवाई वाशिम गुन्हेशाखेकडून करण्यात आली असली जऊळका पोलीस स्टेशन हद्दीत हा जुगार सुरु होता मात्र तो जऊळका पोलीसांनाच माहिती नसावा ही बाब पचणारी नाही. जऊळका पोलीसांच्या अगदी
नाकावर टिच्चून जऊळका पोलीस हद्दीत असे अनेक जुगार अड्डे अजुनही सुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरु असलेल्या जुगाराची माहिती जर का वाशिम गुन्हेशाखेला कळते तर जऊळका पोलीसांचा शिलेदार डोळे मिटून बसलाय काय? असा सवाल जनता मायबाप करत आहे. जुगारापाई अनेक घरे उध्वस्त झाली तरी राजरोज या अवैध धंद्याना मुकसंमती देते तरी कोण हा सवाल कायम आहे. गुन्हेशाखेकडून करण्यात आलेली कारवाई
अगदी सहज कौतुकास्पद असली तरी जुगारांचे
अड्डे काही काळ बंद करुन पुन्हा खुलेआम सुरु होतात यास जबाबदार कोण? बंद झालेले अवैध धंदे भाववाढी साठी तर बंद करुन पुन्हा भाववाढी नतंर मुकसंमतीने सुरु तर होत नसतील ना? याला मुकसंमती देते तरी कोण हा प्रश्न अनुत्तरीत आहे. जऊळका शिलेदार दिवाळीच्या मोक्यावर जुगार खेळणाऱ्यावर कशी करवाई करतील किंवा नही हे पुढे बघण्यासाठी जनता आतूर आहे. अवैध धंदे हद्दपार करुन अनेक कुटुंब उघड्यावर येण्यापासुन जऊळका पोलीस शिलेदार वाचवतील का याकडे जनतालक्षठेवून आहे.



