Uncategorized

तेल्हारा शहरातील जय भवानी नवदुर्गा उत्सव मंडळाला 50 वर्षे पूर्ण ! , त्यानिमित्य मंडळानी केले विविध कार्यक्रमाचे आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि. 7 ऑक्टोंबर 2024 |
तेल्हारा शहरातील सुप्रसिद्ध जय भवानी नवदुर्गा उत्सव मंडळाला 50 वर्षे पूर्ण होत असून यावर्षी मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . जय भवानी नवदुर्गा उत्सव मंडळाचे 50 वर्षपूर्ती निमित्त यावर्षी मंडळाकडून विशेष देखावा म्हणून कैलास पर्वत शृंखलेतील देवांचे देव महादेव यांच्या भक्तीत मग्न अशी जलाभिषेक करताना आदिशक्ती अष्टभुजा निर्मित देवी भगवती पार्वती माता यांची पुत्र गणेशासह अतिशय सुंदर, विलोभनीय मूर्ती साकारली आहे. जय भवानी मंडळाचे 50 वर्ष पूर्ती निमित्ताने सुरू असलेल्या नवरात्रीच्या पावन पर्वमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. यामध्ये नवरात्रीच्या प्रथम दिवसाला गोरगरीब महिलांना व मंडळातील पूर्वीपासून असलेल्या सदस्य परिवारातील महिलांना सहावारी तसेच नऊवारी साडीचे वाटप करण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button