छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती मुक्ताईनगर यांनी आयोजित केली रांगोळी स्पर्धा


(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रमोद सौंदळे) :-
सविस्तर वृत्त असे की छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समिती मुक्ताईनगर यांच्यातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे

त्यामध्ये रांगोळी स्पर्धेचे सुद्धा संत मुक्ताई कला वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर या ठिकाणी नियोजन केलेले होते यामध्ये बऱ्याच स्पर्धकांनी

उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला यामध्ये रांगोळी काढण्यासाठी आयोजकांनी कुठलाही विषय दिलेला नसतानी सुद्धा स्पर्धक विद्यार्थी विद्यार्थिनींनी सुंदर सुबक आणि आकर्षक अशा एकापेक्षा एक रांगोळ्या काढून सर्वांचे मन मोहित होतील

आणि त्या रांगोळ्या मधून सुद्धा काही ना काही संदेश हा सर्व समाज बांधवांना दिलेला आहे या रांगोळी पूर्णपणे काढून झाल्यानंतर संत मुक्ताई कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षकांनी पाहणी करून स्पर्धकांचे कौतुक केले यासाठी डॉ . प्रवीण बोदडे डॉ. निकिता बोदडे पंकज झनके अँड. कुणाल गवई युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे प्रयास ग्रुप अन्नू बोदडे विजू माळी गायकवाड सर शेवाळे सर आणि संयुक्त जयंती उत्सव समिती आयोजक उपस्थित होते




