आ अँड आकाश फुंडकरांनी केले महात्मा फुले यांना अभिवादन

।भाजपा कार्यालयात देखील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती थाटात साजरी थोर विचारक व समाजसुधारक क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबांचे गुण सर्वांनी अंगिकारावे- आमदार ॲड आकाश फुंडकर, भाजपा जिल्हाध्यक्षखामगाव :- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आज भाजपा कार्यालयात थाटात साजरी करण्यात आली. यावेळी भाजपा कार्यालयात आमदार ॲड.आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले व अभिवादन केले. यावेळी जय ज्योती जय क्रांतीच्या घोषणा देण्यात आल्या.आज सकाळी 9.15 वा महात्मा जोतिबा फुले यांची जयंती भाजपच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक सामान्य रुग्णालयातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांनी पूजन केले. तसेच पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष हृषीकेश जाधव, भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, डॉ एकनाथ पाटील, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, शहाराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, माजी प स सभापती सौ उर्मिलाताई गायकी, माजी कृ उ बा स सभापती संतोष टाले, दिलीप पाटील, महेंद्र रोहनकार, राजेंद्र धानकार, विजय उगले, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, नगेंद्र रोहनकार, विनोद टिकार, शेखर कुलकर्णी, सुभाष इटणारे, रोहन जयस्वाल, रुपेश शर्मा, दत्ता जवळकर, संदीप राजपूत, प्रसाद एडलाबादकर, गोलू आळशी,आदी भाजप कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे सुरेश वावगे, संजय अवताडे, अँड बाबू भट्टड, सुजित तायडे, यांनीही महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सर्वांनी माळी सेवा मंडळ खामगावच्या वतीने आयोजित मोटारसायकल रॅलीत सहभागी होऊन जय ज्योती जय क्रांती नारे देत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयघोष केला. त्यानंतर स्थानिक भाजप कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. आ अँड आकाश फुंडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.



