छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आमदार ॲड आकाश फुंडकरांचे हस्ते शुभारंभ/

/////////////////////////स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे///////////////////////////“जीवनात काहीतरी करुन दाखविण्याचा चटका लागला तर आयुष्य़ बदलून जाते- आ.ॲड आकाश फुंडकर खामगाव : – “आज अनेक महान लोक त्यांचे 10 वी चे गुण पाहिले तर यांनी जीवनात काही केल असेल असे वाटत नाही. परंतु 10 किंवा 12 वी मध्ये मिळालेल्या कमी गुणांमुळे हे लोक जिददीने पेटून उठले व त्यांनी त्यांच्या जीवनाची गुणपत्रिका बदलवून टाकली. त्यामुळे आज तुम्ही जे काही शिकत आहात त्यात संकल्प़ करा की मी जगासाठी एक उदाहरण बनेल. दृढनिश्चयच़ माणसाला यशाच्या उच्च़शिखरावर पोहचवतो. त्यामुळे जिददीने पेटून उठा व आपल्या पालकांना जीवनात काही तरी करुन दाखवा.आज खामगांव येथील कौशल्य , रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगाव च्या वतीने आज 30 मी रोजी “छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर” आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वेळी बोलत होते. या शिबिराचे उदघाटन आ अँड आकाश फुंडकर यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी मंचावर आ अँड फुंडकर यांचेसह उपविभागीय अधिकारी अतुल पाटोले, खामगाव प्राचार्य पी के खुळे, नांदुरा प्राचार्य श्री काळे, मलकापूर प्राचार्य भावले, प्रा अरविंद शिंगाडे, जिल्हा उद्योग केंद्र अधिकारी श्री अंभोरे, समन्वयक श्री खराटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे विद्यार्थी यांनी केलेल्या जॉबवर्क ची पाहणी आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केली व त्यांनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक देखील आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केले.यावेळी मार्गदर्शन करतांना आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले की, केंद्रात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मार्गदर्शनात कौशल्य़ विकास, उद्योजकता विकास या क्षेत्राला सुगीचे दिवस आले आहेत. कौशल्य़ विकास मंत्री मा.श्री मंगल प्रभातजी लोढा यांनी राज्यभरातील औद्यागिक प्रशिक्षण केंद्रात छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन करण्याचा निर्णय जाहिर केला. आज आय.टी आय मधील प्रमाणपत्राच्या भरवश्यावरच अनेक तरुणांना नोकरी लागत आहे. तर अनेक तरुण उद्योग उभारत आहेत. महाराष्ट्रातील विविध कंपन्या युवकांना रोजगार उपलब्ध़ करुन देत आहेत. खामगांव औद्यागिक प्रशिक्षण केंद्र येथील अनेक विद्यार्थ्यांची निवड इंडोराम्स़ कंपनी संभाजीनगर येथे निवड करण्यात आली आहे. तर हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीत देखील खामगांव येथील मुलींची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे औद्यागिक प्रशिक्षण केंद्र याला कौशल्य़ विकासाच्या दृष्टीने मोठे महत्व़ प्राप्त़ होणार आहे. मेहनत करा, जीवनात काहीतरी करुन दाखविण्याचा चटका लागला तर ती व्यक्ती यशस्वी होते. यश अपयश हे आपल्याच हाती असते त्यामुळे जिददीने पेटून उठा आणि आपल्या आईवडीलांनी पाहिलेले स्वप्ऩ पुर्ण करा. यशस्वी व्हा.यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल पाटोळे, यांनीही मार्गदर्शन केले. तत्पश्चात अरविंद शिंगाडे यांचे मार्गदर्शन या शिबीरात लाभले.



