चोरी गेलेली दुचाकी 24 तासात पोलिसांकडून जप्त..स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे

चोरी गेलेली दुचाकी तक्रारीनंतर 24 तासात जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. जळगांव जामोद येथील उदय कॉलनीतील रहिवासी से निवृत्त शिक्षक यशवंत लक्ष्मण उमरकर यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच 28 ए व्ही. 0302 ही अंदाजे 20 हजार रुपये किमतीची 5 सप्टेंबर रोजी घरासमोर उभी केली होती. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सकाळी 11 वाजे दरम्यान ही दुचाकी चोरून नेली. याबाबत उमरकर यांनी जळगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून कलम 302 (2) बी एन एस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बागुल साहेब यांच्या आदेशावरून उपनिरीक्षक गणेश कायंदे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून वडनेर भोलजी तालुका नांदुरा येथे दुचाकी पकडून जप्त केली. व आरोपी संतोष वसंतराव कोथळकर राहणार अयोध्या नगर यास अटक केली आहे.
✍🏾



