बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

घरासमोर उभी असलेली अँपे रिक्षा लंपास गुन्हा दाखल..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगांव जामोद

आसलगाव येथे घरासमोर उभी असलेली अँपे रिक्षा अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगांव जामोद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आसलगाव येथील रिक्षा चालक सुनील बघे वय वर्ष 45 यांनी त्यांची ॲपे रिक्षा क्रमांक एम एच 19 AX 9581 दिनांक 5 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 1.50 वाजेच्या सुमारास पळशी सुपो रोडवरील घरासमोर उभी केलेली होती. दुसऱ्या दिवशी रिक्षा कुठेही आढळून आलेली नाही. अखेर सुनील बघे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन ठाण्यात धाव घेत तक्रार दिली चोरीस गेलेल्या अँपे रिक्षाची अंदाजे किंमत 30 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी जळगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
✍🏾

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button