चिखली शहरात मोकाट कुत्र्यांचा चिमुकल्याला चावा, चिमुकला गंभीर जखमी,मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा- स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी-संजय खेडेकर
चिखली -दि.११ शहरातील संभाजी नगर परिसरासह शहरात मोकाट कुत्र्यांनी प्रचंड हैदोस घातला असुन एका ५ वर्षीय चिमुकल्या ला चावा घेतल्यामुळे शहरात नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना दि. ९. सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
याबाबत सविस्तर असे की, जाफ्राबाद रोडलगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळील परिसरातील एका मोकाट कुत्र्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल वाकोडे यांच्या घरासमोर अयांश प्रमोद सुरडकर या ५ वर्षीय चिमुकल्यावर घराबाहेर खेळत असताना जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामुळे नागरिकांसह लहान मुले, वृद्ध तथा महिला वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या पाच-सहा दिवसापूर्वी मुलांसह नागरिकांना या परिसरातील मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे अनेकांवर खाजगी रूग्णालयात उपचार घेण्याची वेळआली आहे. यापूर्वी सुद्धा अनेक घटना या परिसरात घडल्या असून अनेक बालकांवर जीवघेणे हल्ले झाले आहे.
यासंदर्भात आज दि. ११ सप्टेंबर रोजी पालिका प्रशासनास रितसर निवेदन देण्यात आले असून निवेदनामध्ये संभाजी नगर परिसरासह शहरातील सर्वच परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, येत्या ७ दिवसांत पालिका प्रशासनाने कार्यवाही न केल्यास लोकशाही मार्गाने पालिकेसमोर या परिसरातील नागरिक, तथा महिला वर्ग आमरण उपोषणास बसतील. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटने युवा नेते अनिल वाकोडे यांनी यावेळी दिला.
याची सर्व जबाबदारी पालिकेची राहील . असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल वाकोडे यांच्यासह परिसरातील समाधान अवसरमोल, भिमराव सुरडकर, विमल सुरडकर, तुळसाबाई अवसरमोल, गोपाल येवतकर, गौतम हिवाळे, मनीषा येवतकर, रवींद्र डोंगरदिवे, सविता सुरडकर, आशा सुरडकर, सोनाली गायकवाड, प्रतीक गायकवाड, उत्तम वानखेडे, सुरेखा वानखेडे, सुदाम भालेराव, लता गवई, एडवोकेट व्ही एस बनकर यांच्या सह्या आहेत.



