जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

चिखली तालुक्यात ‘कोरडा दुष्काळ जाहीर करा; पीक विमा तातडीने मंजूर करा -राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ) ची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी-संजय खेडेकर

चिखली- दि.११ तालुक्यात

गेल्या चाळीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके पूर्णपणे वाळून गेली आहेत. पेरणीचा खर्चही निघणार नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, यासाठी आज दि.११ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

तालुक्यात तातडीने ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करून शासकीय मदत लागू करावी.
चालू वर्षाचा पीक विमा कोणतीही तांत्रिक अडवणूक न करता त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा.
सुकलेल्या पिकांचे महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत.
आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा आणि न्याय मिळावा, मागण्यांची पूर्तता न झाल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी तहसीलदार विजय सवडे यांच्यामार्फत नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष सौ. ज्योतीताई खेडेकर, यांच्यासह तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार, शहराध्यक्ष रवींद्र भाऊ तोडकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा बाजार समितीचे उपसभापती रामभाऊ खेडेकर, जिल्हा सचिव सुनील भाऊ खेडेकर, जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ,डॉ विकास मिसाळ, प्रतापसिंग पवार, सतीश भुतेकर, भिकनराव भुतेकर, प्रशांत डोंगरदिवे, निंबाराव देशमुख, शेख नईम कुरेशी, दिलीप महाजन, रामेश्वर घाडगे, राजू नेमाने, संजय सावंत, तुकाराम सोळंके, नासीर कुरेशी,अमोल भुतेकर, किसन काळे, तुकाराम सापते, गणेश देशमुख, प्रसाद पाटील, अक्षय सुरसे उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button