खानदेशबुलढाणामहाराष्ट्रमुबईविदर्भ

चक्क ग्रामसभेतून सरपंचाने केला प्रोसिडिंग बुकसह फरार

चक्क ग्रामसभेतून सरपंचाने केला प्रोसिडिंग बुकसह फरार

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव – : ब्राम्हणवाडा गावाचे नाव रोजगार हमी योजनेच्या महाभ्रष्टाचाराने अख्या महाराष्ट्रात गाजले. वादग्रस्त गाव म्हणून गावात ग्रामसेवक यायला घाबरत असल्याचे चित्र समोर आले आहे. सदर गावाचा कारभार निर्भिडपणे केवळ ग्रामसेवक मोहन वानखेडे चालवू शकत असल्याचा सूरही यावेळी उमटला. प्रभारी ग्रामसेवक मोहन वानखडे यांची ब्राम्हणवाडा येथून बदली झाल्याने येथे ग्रामसेवक यायल तयार नसताना शेवटी महिला ग्रामसेवक करवते यांची प्रभारी महिला ग्रामसेविका म्हणून नियुक्ती

करण्यात आली. ग्रामसेविका येथे नियमित येत नसल्याचा वारंवार आरोप झाला. सदर प्रकरणी पंचायत समिती स्तरावर तक्रारी सुद्धा करण्यात आल्यात. मात्र कार्यवाही शून्य असल्याने खुद सरपंच नागरे हतबल झालेत. ग्रामसेविका करवते 1 महिन्याच्या आजारी रजेवर गेल्या त्यांनी ग्राम पंचायतचे दस्तावेज सोबत नेल्याचा सरपंचाने आरोप करत नवीन ग्रामसेवकांची नियुक्ती आणि ग्राम सेविकेवर कार्यवाहीचा मागणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.

ऑगस्ट महिन्यात ग्रामसभा घेण्याचे बंधनकारक असल्याने पंचायत समिती स्तरावर केवळ ग्रामसभेसाठी एकदिवस ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आली 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सरपंच गोपीनाथ नागरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेला शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभेला सुरुवात झाली. विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तंटामुक्ती अध्यक्ष आणि रोजगार सेवकांची निवडी प्रक्रिया सुरू असताना कायद्यावर बोट ठेवण्यात आल्याने गदारोळ उडाला.

गदारोळ वाढत असल्याने सरपंच नागरे यांनी सभा तहकूब करत प्रोसीडींग बुक घेवून पोबारा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सदर प्रकरणी विरोधकांनी सरपंच गोपीनाथ नागरे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणला प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button