बुलढाणामहाराष्ट्र

शेगावच्या रेल्वे स्थानकात लवकरच ‘रेस्टारंट ऑन व्हील .

.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

शेगाव विशेष न्यूज रिपोर्टर श्याम
पहुरकर

मध्य रेल्वेकडून देशभरातील अनेक रेल्वे स्थानकावर सुरु करण्यात आलेल्या रेस्टॉरंट ऑन व्हील योजनेला तुफान प्रतिसाद मिळत आहे.
यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रेल्वे स्थानकावर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरु करण्याची तयारी सुरु आहे. या रेस्टॉरंटकरिता रेल्वेने एक कोच सुद्धा तयार केला आहे. हा कोच काल शेगाव स्थानकावर दाखल झाला आहे.
यामुळे संत नगरीत एका आगळ्यावेगळ्या रेस्टॉरंटची भर पडनार असून हे रेस्टॉरंट चक्क रेल्वेच्या डब्यामध्ये साकारण्यात येणार आहे.
अनेक रेल्वे स्थानकात खाद्यपदार्थाचे स्टॉल्स असले तरी बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल असे रेस्टॉरंट नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. प्रवाशांना रेल्वे हद्दीतच चांगल्या दर्जाचे रेस्टॉरंट व खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिल्यास उत्पन्नही मिळेल, या उद्देशाने भारतीय रेल्वेने ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ ही संकल्पना सुरू केली आहे. मध्य रेल्वेने ही संकल्पना उचलून धरत शेगावच्या ३ नंबर प्लॅटफॉमर्बाहेर रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरु करीत आहे.
हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेला रेल्वे डब्यात तयार करण्यात येत आहे. यामध्ये ४० जणांना बसण्याची सोय होणार आहे.
येथे प्रवासी, पर्यटकांना व्हेज आणि नान व्हेज दोन्ही पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. रेल्वेकडून रेस्टॉरंटसाठी वापरातून काढून टाकलेल्या रेल्वे डब्याचे रंग-रंगोटीचे काम होणार आहे.
मध्य रेल्वेकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ या संकल्पनेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेने सुरु केलेल्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हॉटेलमधून मध्य रेल्वेला काही वर्षात ४० लाखांपर्यंत उत्पन्न प्राप्त होणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button