घोडसगाव ता. मुक्ताईनगर येथील शेतकरी पुत्र संजय संतोष सावळे या युवकाची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड :-(तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)

सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे घोडसगाव येथील शेतकरी संतोष फकीरा सावळे घोडसगाव या ठिकाणी शेती करून आपला उदरनिर्वाह करत असतात त्यांच्या परिवारात त्यांची पत्नी एक मुलगा एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचा मुलगा संजय सावळे याचे प्राथमिक शिक्षण त्यांनी मुक्ताईनगर येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल तसेच जी इ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तर ग्रॅज्युएशन एस एम कॉलेज मुक्ताईनगर या ठिकाणाहून पूर्ण केले त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पास करून घवघवीत यश मिळवले एका छोट्याशा खेडेगावातून त्यांनी आपल्या जिद्दीने परिश्रमाने अभ्यास करून यश मिळवले आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदावर त्यांची निवड झाली त्याप्रसंगी मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय धनराज पाटील साहेब तसेच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय आशिषजी अडसूळ यांच्यातर्फे आज त्यांचा मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये सत्कार करण्यात आला त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांसह पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे…
आज जे जे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करत आहेत किंवा इतरही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील त्या सर्वांनी एखाद्या अपयशाला न घाबरता जिद्दीनं आणि जोमाने प्रयत्न केला तर यश निश्चित मिळेल प्रयत्ने “वाळूचा कण रगडीता तेल ही गळे ” असा संदेश त्यांनी आज स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला



