बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

मकरध्वज खंडाळा येथील सरपंच, सौ. उज्वला जाधव यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव पारित.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी,-संजय खेडेकर

चिखली- दि.८ येथून जवळच असलेल्या खंडाळा मकरध्वज येथील सरपंच उज्वलाताई पुरुषोत्तम जाधव यांच्या अनिरुद्ध ग्रामपंचायतच्या आठ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वास दाखल केल्यानंतर काल दुपारी ३ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अविश्वास ठरावाच्या बाजूने ८ सदस्यांनी हात वर करून मतदान केले. तर विश्वास ठरावाच्या विरोधात २ सदस्यांनी मतदान केले. अविश्वास ठराव पारित होण्यासाठी ३/४ पेक्षा जास्त बहुमत असल्यामुळे सरपंच यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव पारित झाला.

याबाबत थोडक्यात वृत्त असे की,
ग्रामपंचायत खंडाळा म. चे सरपंच सौ उज्वला पुरुषोत्तम जाधव यांचे विरुध्द शेख जावेद शेख गुलाब ग्रामपंचायत सदस्य व इतर ७ ग्रामपंचायत सदस्य यांनी दि.१ सप्टेंबर रोजी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दाखल केल्यावरुन दि.७ सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय खंडाळा म. येथे अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी तहसीलदार विजय सवडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेस सरपंच व सर्व 9 सदस्य उपस्थित होते. सदर विशेष सभेत सरपंच ग्रा.पं. खंडाळा यांचे विरुध्द प्राप्त अविश्वास प्रस्तावावर चर्चा घडवून आणल्यानंतर प्रस्ताव मतदानासाठी मांडण्यात आला.
ग्रा.पं.सरपंच उज्वला जाधव यांचे विरुध्द अविश्वास प्रस्तावाचे बाजून ८ सदस्यांनी हात वर करुन मतदान केले व अविश्वास ठरावाच्या विरोधात २ सदस्यांनी हात वर करुन मतदान केले.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 35 (3) अन्वये अविश्वास प्रस्ताव पारीत होण्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या ¾ पेक्षा जास्त बहूमत असल्यामुळे सरपंच ग्रामपंचायत खंडाळा यांचे विरुध्दचा अविश्वास प्रस्ताव पारीत झाला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button