कल्याण मध्ये ऑनलाईन च्या माध्यमातून फसवणूक……….

कल्याण मध्ये ऑनलाईन च्या माध्यमातून फसवणूक………. स्टार भारत लाईव एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर येथील पूर्व भागातील काटेमानिवली भागात राहत असलेल्या एका औषध विक्रेता महिलेची भामट्यांनी वस्तु घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली ऑनलाईन माध्यमातून दोन लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. मे-जून या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.पूजा उमेश सिंग असे फसवणूक झालेल्या औषध विक्रेता महिलेचे नाव आहे. त्यांनी तिसगाव जरीमरीनगर भागात एक औषध दुकान भाड्याने चालविण्यास घेतले आहे. पूजा या औषध विक्रेता पदविकाधारक आहेत. मे मध्ये संध्याकाळच्या वेळेत पूजा दुकानात बसल्या होत्या. एक इसम औषधांची माहिती घेण्यासाठी दुकानात आला. त्याने जाताना पूजा यांचे भेटकार्ड आणि दुकानाचे छायाचित्र काढून नेले. त्याचे डॅनियल जॅक असे नाव होते.भेटीच्या दोन दिवसानंतर डॅनियल याने पूजा यांना व्हाॅट्स काॅलवर संपर्क केला. तुम्हाला एक वस्तू खासगी वहन कंपनीकडून पाठविली आहे असे त्यांनी सांगितले. ऑनलाईन माध्यमातून सीमा शुल्क मुक्त दर, डाॅलर विनिमय दर, वाहतूक खर्च, इतर दोन लाख पंचात्तर हजार रुपये अशी फसवणूक केली.



