खानदेशशैक्षणिक

गरुड विद्यालयाच्या प्राचार्य पदी आर.एस.चौधरी यांची नियुक्ती

धी शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑप सोसायटी संचलित,

आ.ग.र.गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथील,

प्राचार्य एस पी उदार सर 29 फेब्रुवारी रोजी सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी राणी दानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एस. चौधरी यांची गरुड विद्यालयाच्या प्राचार्य पदी 1 मार्च पासून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

चौधरी सर हे जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक असून त्यांना जिल्हा क्रीडा महासंघाचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार,जिल्हा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार,आदर्श पर्यावरणवादी शिक्षक पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सरांना गौरविण्यात आलेले आहे.
सरांचे विद्यार्थी राष्ट्रीय पातळी पर्यत्त क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल स्थानी पोहोचलेले असल्याचे सरांकडून समजले तसेच विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून देखील सरांचा लौकीक असल्याचा बोलबाला आहे.

या पद नियुक्तीमुळे सरांचं सर्व स्तरावरून अभिनंदन होत असून संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड,उपाध्यक्ष आबासाहेब भीमराव शेळके,सचिव काकासाहेब सागरमलजी जैन,सहसचिव दादासो यु.यु.पाटील,कार्यालयीन सचिव भाऊसो.दीपकजी गरुड या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच गरुड विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील व परिसरातील नागरिकांकडूनही सरांचे अभिनंदन होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button