जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षासरासरी पेक्षा कमी पावसाचे संकेतउशिरा पेरणीमुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता

यावर्षी अत्यल्प पावसाचे संकेत,शासनासह, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तेल्हारा तालुका प्रतिनिधी…
संतोष गिऱ्हे
दर वर्षी जून महिन्यात सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या जून अखेर पूर्ण झाल्या होत्या यावर्षी मात्र जून महिना पूर्ण संपत असून पावसाची हजेरी सुद्धा न लागल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली आहे
यावर्षी सुरुवातीलाच भारतीय हवामान विभागाने देशासह राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले आहेत व त्याची प्रचिती सुद्धा येत आहे जून महिना संपत आला असून अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागात अजून सुद्धा पावसाने हजेरी लावली नसल्याने यावर्षी पेरण्या ह्या जुलै महिन्यात जाणार असून उशिरा पेरणी केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे,अशा परिस्थितीत शासनासह कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
तालुक्यात बहुतांश भागात यावर्षी खरीप मध्ये सोयाबीन, तुर व कपाशी ही पिके घेतली जाणार असून शेतकऱ्यांनी महागडी बियाणे,खते, व कीटकनाशके यांची खरेदी करून ठेवली आहे मात्र पाऊस लांबणीवर पडल्यामुळे शेतकरी बांधव
चिंतातुर झाला असून अशा बिकट परिस्थिती कमी पाण्यात योग्य पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व नियोजन करण्यासाठी गावपातळीवरील तलाठी,कृषी सहाययक यांनी
गावात हजर राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे
अशी मागणी होत आहे
तसेच शालेय सत्र सुरू झाल्याने तालुक्यातील प्रत्येक गावातील तलाठी,ग्रामसेवक यांनी त्यांच्या सह्या विविध शालेय कामासाठी आवश्यक असणाऱ्या दाखल्यावर, कागदपत्रांवर लागणार असल्याने या सर्व कर्मचारी वर्गाने गावात हजर राहून शेतकरी, विद्यार्थी यांचे काम आपल्यामुळे अडणार नाही याची गंभीर दखल देऊन मुख्यालयी राहावे अशी जनतेतून मागणी होत आहे
तलाठी व कृषी सहाययक हे शेतकऱ्यांना गरज पडली तरी बहुतेक गावात हजर राहत नाहीत
किंवा शेतकऱ्यांचे फोन उचलत नाहीत त्यामुळे इतर शासकीय कर्मचारी यांच्याप्रमाणे कृषी सहाययक व तलाठी यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी जणेकसरून ते शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व मदत करू शकतील
पीक विमा योजनेत बदल करून पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई न ठेवता आधीचे सर्व ट्रिगर लागू करावेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला खात्रीलायक विमा कवच मिळेल



