महाराष्ट्र

गणपतीच्या मिरवणूक मार्गावर विद्युत तारांची उंची वाढविण्याची मागणी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – आगामी गणेश उत्सव येताच मालेगाव येथील गणपती मिरवणूक महामार्गावर मध्ये येणारे विद्युतदाराची उंची वाढवण्याबाबत गणपती विसर्जन आणि आगमन सोहळ्यांच्या अनुषंगाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर असलेल्या विद्युत तारा २० फूट उंचीपेक्षा जास्त उंच करण्याची मागणी केली जात आहे विघ्नहर्ता फाउंडेशनचे सर्व सदस्यांनी तथा विघ्नहर्ता गणेश मंडळ यांच्या वतीने महावितरणच्या अभियंता विभागाकडे लेखी निवेदन देऊन मागणी केली प्रमोद गौरकर यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की शहरातील गणेश मंडळांच्या मूर्तींची उंची २० ते २२ फूटांपर्यंत असते त्यामुळे विद्युत तारा कमी उंचीवर असल्यास विसर्जन आणि आगमन सोहळ्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे गणेशोत्सव स्थापनेच्या आधी या तारांची उंची वाढवून सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी मागणी करण्यात आली आहे विघ्नहर्ता फाउंडेशनच्या या मागणी पाहता त्यांनी महावितरण विभागास वेळे आधी काम पूर्ण करण्याची विनंती केली आहे जेणेकरून गणेश मूर्तींचे सुरक्षित मिरवणूक संचलन शहरात सहजपणे करता येईल या अर्जाची प्रत स्थानिक मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेबांकडे देखील पाठवण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button