जळगावा जिल्हासामाजिक
तपत कठोरा येथील वैकुंठ धाम रस्त्याची दयनीय अवस्था

तपत कठोरा येथील वैकुंठ धाम रस्त्याची दयनीय अवस्था
प्रशासनाचे दुर्लक्ष
वरणगाव प्रतिनिधी प्रशांत पाटील
भुसावळ तालुक्यातील गाव तापी नदीकाठी असून या गावात दोन भाग असून एक खालचे गाव व एक वरचे गाव असे आहे
तापी नदी काठ जवळ असल्याने येथील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्नाचा लाभ मिळत असतो
गावातील इतर रस्ते वगळता मात्र वैकुंठ धाम रस्त्याची अत्यंत निंदनीय अवस्था ही बघावयास मिळत आहे त्यातच पावसाळ्यात तर रस्त्यात चिखल की चिखलात रस्ता हेच कळेनासे झाले आहे
तपत कठोरा या गावातील कुठल्या गावकऱ्याचा मृत्यू झाल्यास अंतिम वेळी सुध्दा खाली वर असलेल्या चिखल मत रस्त्यातून वाट धरावी लागते
वैकुंठ धाम रस्ता डांबरीकरण करून प्रशासन न्याय देणार का याविषयी गावात चर्चा सुरू आहे



