बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन; गणेशोत्सवाचा अभूतपूर्व जल्लोष!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी: गजानन तांगडे,खामगांव

खामगाव : गणेश स्थापनेच्या दिवशी
सोमवारी गणपती बाप्पा मोरयाचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी करणाऱ्या भक्तांमधील उत्साह शिगेला पोहचलेला दिवसभर शहरात दिसून आला. वाजत गाजत गणरायांच्या मुर्त्या नेवून घरोघरी त्याचप्रमाणे
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात मुर्ति स्थापनेने गणेशोत्सवाला सुरुवात झाली. उत्साह आणि परंपरेचा हा संगम तरुणाईमध्ये दिसून येत होता.
गणेशोत्सवाच्या येत्या १० दिवसात सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक व धार्मिक देखावे सादर करून समाज प्रबोधन
करण्याचा प्रयत्न केला आहे. काही मंडळाचे देखावे गणेश उत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून सुरु होणार आहे. अनेक मंडळांनी भव्य व आकर्षक गणेश मुर्त्या स्थापन केल्या आहेत. खामगाव शहर पोस्टेच्या हद्दीत ४४ तर शिवाजी नगर पोस्टेच्या हद्दीत ६१ असे शहरात एकूण १०५ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची
स्थापना केली आहे.
स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प. मैदानावरुन गणेशमुर्त्या खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच
गणेशभक्तांची गर्दी होती. बाळगोपालांचे गणेश मंडळही मोठ्याप्रमाणात वाजत गाजत गणेश मुर्ती नेत असल्याचे दिसत होते. गणरायाच्या आगमनाने शहरात सर्वत्र दणदणाट होता. जिल्ह्यातही शेकडो मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे. अनेक महिलांनी सुध्दा
गणेश मुर्ती खरेदी करण्यासाठी न. प. मैदानावर गर्दी केली होती. १०० हून अधिक दुकाने मैदानावर थाटल्याने हजारो मुर्त्यांची विक्री दिवसभर झाली आहे. ३०० रुपयांपासून तर १० ते २० हजार रुपयांपर्यंत गणेश मुर्त्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button