आता कामासाठी थांबणार. तहसीलदार. नायब तहसीलदार दुपारनंतर कार्यालयात हजर राहणे बंधनकारक:

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दि.१५/९/२०२६.
संग्रामपूर तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांना कामासाठी आता जिल्हा कार्यालयात किंवा शासकीय मंत्रालयाचे हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही. स्थानिक पातळीवर अधिकारी भेटत नसल्याने त्रस्त झालेल्या संग्रामपूरकाना महाराष्ट्र शासनाने मोठा दिलासा दिला आहे. राज्य शासनाच्या महसूल विभागाने ९ सप्टेंबर 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी केले असून, त्यानुसार तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांसाठी जनतेला भेटण्याची वेळ निश्चित केली आहे.
दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत संग्रामपूर तहसीलदार जागेवरून हलवणार नाही.
नव्या नियमानुसार, संग्रामपूर तालुक्याचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार तसेच जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांना (जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी) सर्व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी तीन ते पाच ही वेळ अनिवार्य पणे सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीसाठी आणि तक्रार निवारण्यासाठी राखीव ठेवावी लागणार आहे.
व्हीसी अंतर्गत बैठकावर बंदी:
अनेकदा महत्त्वाची बैठक सुरू आहे. किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (vc) चालू आहे. असे सांगून अधिकारी नागरिकांना भेटणे टाळतात किंवा त्यांना ठेवतात शासनाने यावर कडक घेतला आहे. नव्या आदेशानुसार दुपारी तीन ते पाच या राखीव वेळेत कोणत्याही प्रकारची बैठक किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेता येणार नाही. हा वेळ फक्त आणि फक्त जनतेसाठी द्यावा लागेल.
संग्रामपूर तहसीलदार कार्यालयात आता हे बदल दिसणार:
१) प्रवेशद्वार वर नोंदवही: कार्यालयात येणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील प्रत्येक नागरिकांची नोंद ठेवण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर मध्यवर्ती नोंदवही (visitor.register). ठेवली जाईल
२) माहिती फलक लावणे बंधनकारक: नागरिकांना या राखीव वेळी ची माहिती मिळावी म्हणून संग्रामपूर तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि संबंधित अधिकाऱ्याच्या केबिन बाहेर ठळक अक्षरात सूचनाफलक लावावे लागेल.
३) वेळ आणि पैशाची बचत: स्थानिक अधिकारी जागेवर उपलब्ध नसल्यामुळे लोकांना साध्या तक्रारीसाठी वरिष्ठ कार्यालयाचे उंबरठे झीजवावे लागायचे , आता स्थानिक पातळीवरच दोन तास राखीव मिळाल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.
शासनाच्या या आक्रमक पवित्र्या मुळे संग्रामपूर तालुक्यातील प्रशासनात सुधारणा होईल आणि सर्व सामान्य ची कामे वेळेत होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आता संग्रामपूर तहसील कार्यालयात या आदेशाचे किती तंतोतंत पालन होते. याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.



