खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना चकमा देऊन फरार

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगांव :- येथील सुवर्णकार व सराफाव्यावसायिकावर झालेल्या हल्यात सराफा कारागीराचा खून करण्यात आला होता त्यातील आरोपी हा पोलिसांना चकमा देऊन फरार झाला आहे.
मालेगाव पोलीस स्टेशन येथे दि 22 डिसेंम्बर 2021 रोजी हत्याकांड आणि दरोडा या गुन्ह्यानुसार अपराध क्रमांक 522/2021 कलम 396 397, 120 (B) भादवी सह के 3/25 आर्म ऍक्ट नुसार गुन्हा नोंद झाला होता. गुन्हयात तपासा दरम्यान 5 आरोपी निष्पन्न झाले होते. अजाबराव बबनराव घुगे रा सुकांडा दिनेश किसनभाई मिरापुरे रा. अहंमदाबाद गुजरात संतोष दत्तात्रय माने माने रा. सातारा हुसेन उर्फ हसन सलीम खाटीक रा. अकोट हितेस उर्फ सिताराम भाटीया रा. अहमदाबाद यांना मालेगांव पोलीसांनी अटक केली होती सदर आरोपी विरुद्ध वाशिम येथील शेषणकोर्ट येथे अंडरड्रायल केस सुरु होती. सदर गुन्हयात यातील फिर्यादी व साक्षीदार यांचे बयान झाले असून काही साक्षिदाराचे बयाण बाकी असून यातील आरोपी नामे दिनेश किसनभाई मिरापुरे, बय 45 वर्ष रा. अहमदाबाद वाशिम कारागृह येथुन मेडीकल चेकअप करीता दि. 12/8/24 ला नेले नागपुर हॉस्पीटल येथे नेले असता, तेथून तो पोलीसांना चकमा देउन फरार झाला आहे. यावरूण सदर आरोपी विरुद्ध पो.स्टे. अजनी नागपुर येथे अप क्र. 460/2024 कलम 262 BNS (भारतीय न न्याय संहीता 2023) अन्वये गुहा नोंद करण्यात आला आहे. तरी सदर आरोपीचा मा. पोलीस अधीक्षक साहेब, वाशिम यांनी आपले पथक नेमून तात्काळ अटक करावी. सदर आरोपी पुन्हा गंभीर गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही..




