खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुबईराजकीय

प्रधानमंत्री ग्रामसडक अंतर्गत रावेर लोकसभा क्षेत्रात संघात २० कोटींच्या ४ रस्त्यांच्या कामांना मंजूरी…

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच मंत्री श्री.गिरीषजी महाजन यांच्या मार्गदर्शनाने रावेर लोकसभा अंतर्गत बोदवड, रावेर व यावल तालुक्यातील विविध रस्त्यांना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (टप्पा 3) अंतर्गत २२ किमी लांबीच्या ४ रस्ते कामासाठी २० कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी मिळाली आहे, अशी माहिती ना. खडसेंचे स्वीय्य सहाय्यक तुषार राणे यांनी दिली.

या कामांमध्ये यावल तालुकांतर्गत कासारखेडा – किनगांव – चुंचाळे – दहीगांव – कोरपावली ते प्रजिमा १८ (लांबी ८.३४ किमी) रु. ८३४ लक्ष, कोळवद – सांगवी बु. – बोरखेडा – हिंगोणा ते विटवा रस्ता (लांबी ३.१५ किमी) रु. २७५ लक्ष, बोदवड तालुकांतर्गत साळशिंगी ते जलचक्र बु. ते प्रजिमा ४७ रस्ता (लांबी ५.५० किमी) रु. ४७२ लक्ष व रावेर तालुकांतर्गत केऱ्हाळे – कर्जोद – निरूळ ते जिल्हा हद्द रस्ता (लांबी ४.५२ किमी) रु. ४०७ लक्ष असे या २२ किमी लांबीच्या ४ रस्ते कामासाठी २० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असून, यामुळे सदर परिसरातील नागरिकांनी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे आभार मानले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button