आगामी जि.प,पं.स,न.प च्या निवडणुकीसाठी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी सज्ज व्हावे – शिवसेना (उ.बा.ठा) जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने

मलकापुर प्रतिनिधी (शेख निसार):- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांच्या प्रमुख उपस्थितीत मलकापूर शहर व तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक दि. 19 डिसेंबर गुरुवार रोजी स्थानिक विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती.
मलकापूर शहर व तालुका शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज राहावे असे आव्हान यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी केले यावेळी शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर, उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, उपशहरप्रमुख शकील जमदार, उपशहरप्रमुख शेख समद कुरेशी, कामगार सेना तालुकाप्रमुख रामभाऊ थोरबोले, कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास, वाहतूक सेना शहर प्रमुख इमरान लकी, किसान सेना शहर प्रमुख सै. वसीम सै. रहीम, माजी नगरसेवक रवींद्र गव्हाळे, युवासेना तालुकाप्रमुख पवन गरुड, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित राजपुत, उपतालुकाप्रमुख राजेंद्र काजळे, संतोष बोरले,ईमामभाई,शेख.नासिर, सत्तार शाह, यासिन कुरेशी,ईसाक तेली,हासिमभाई, जुबेर भाई,माजीद, ईमरानभाई,फयेजभाई,सह शिवसेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.



