खामगावतून सहा लाखाची बॅग लंपास करणाऱ्या गॅंगचा पर्दाफाश……

खामगावतून सहा लाखाची बॅग लंपास करणाऱ्या गॅंगचा पर्दाफाश……
( जी. डि.रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी) खामगाव- एल सी बी पथकाने शेगाववा त तिघांना ठोकल्या बेड्या सात जण फरार तवेरा गाडीत आढळले दरोडा टाकण्याचे साहित्य. मोठ्या दरोड्याचा कट उधळला स्थानिक गांधी चौक येथून एक्टिवाच्या डिक्कीतून सहा लाखाची बॅग लंपास करणाऱ्या गुजरात मधील गॅंगचा पोलिसांनी परदाफस केला .आहे तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेगाव बाळापुर रोडवरील एका शेतात दरोड्याचा कट रचत असलेल्या या टोळीतील तिघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून एक तवेरा गाडी व दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे .मात्र पोलीस आल्याचे माहित पडताच यातील सात जण फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. चोरी करणारे भामटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते. त्या आधारे पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासून चोरट्यांच्या शोधासाठी वेगवेगळे पथक तयार केले होते. स्थानिक गुन्हे शाखा बुलढाण्याचे पथक शेगावतील लोजेस व हॉटेलची तपासणी करत .असताना शेगाव बाळापुर रोडवरील आनंद सागर पासून काही अंतरावर एका शेतात तवेरा व दुजाकी सह आलेले काही जण अंधारात थांबलेले आहेत



