देवाच्या दर्शनास आलेला भक्त देवाघरी… प्रकृती बिघडल्याने तेजराव डहाके यांचा मृत्यू

देवाच्या दर्शनास आलेला भक्त देवाघरी… प्रकृती बिघडल्याने तेजराव डहाके यांचा मृत्यू
( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)शेगाव येथे श्रींच्या दर्शनासाठी परिवारासह आलेल्या चिखली येथील एका ६० वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक भक्ताची प्रकृती अचानक बिघडल्याने श्रींचे दर्शनाला आलेले भक्त देवाघरी गेल्याची घटना १९ मार्च रविवार रोजी सकाळी घडली. .बुलडाणा जिल्हा योगा असोसिएशनचे सचिव तथा चिखली येथील रहिवाशी सेवानिवृत्त शिक्षक तेजराव डहाके हे त्यांची पत्नी व व्यवसायाने डॉक्टर असलेला त्यांचा मलया ऋषिकेश डहाके यांचे सोबतखाजगी वाहनाने १९ मार्च रोजी सकाळी श्रींचे दर्शनासाठी शेगावला आले होते. १० ते १०.३० वा. दरम्यान मंदिरातील दर्शन रांगेत लागलेले असताना तेजराव डहाके यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना त्याच अवस्थेत त्यांचा डॉक्टर मुलगा व पत्नी यांनी मंदिर मधील सेवाधारी यांचे मदतीने दर्शन बारी मधून बाहेर आणले. तसेच स्वतः मुलगाच डॉक्टर असल्याने त्यांनी त्यांची तपासणी केली व श्री संस्थान मधून| रुग्णवाहिका मागितली. लगेच श्री संस्थानची रुग्णवाहिका | येथे पोहचली व त्यांना तेथून रवाना केले. दरम्यान रस्त्यात त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती मिळाली.तेजराव डहाके हे योगा असोसिएशन चे बुलडाणा जिल्हा सचिव होते. त्यांचे परिवारसह श्रींचे दर्शन आटोपून खामगाव येथील महिला महाविद्यालयात आयोजित योगा कल्चरल वेल्फेअरला ते उपस्थित राहणार होते.मात्र त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. (ता. प्र.)



