खाजगी वाहनांवरती महाराष्ट्र शासन नावाने पाटील स्टिकर बोधचिन्ह लावल्या वाहनांवरती कारवाई होणार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
अनेक शासन संबंधित आपल्या खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासनाच्या नावाचा बोर्ड अथवा स्टिकर लावून गाड्या फिरवत आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या स्पमालाची वाहने वगळता खाजगी वाहनांवरती महाराष्ट्र शासन लिहून व आतील भागात महाराष्ट्र शासन नावाची लाल रंगाची पाटी लावल्यास मनाई करण्यात आली आहे ज्या खाजगी वाहनांवर किंवा वाहनात महाराष्ट्र शासन नाव लाल रंगाची पाटी लावून तसेच वाहनाच्या आतील भागास स्टीकर चिटकवून अथवा बोधचिन्हाचा वापर करून वाहने रस्त्यावर फिरवताना आढळल्या आल्यास अशा वाहनांवरती मोटर वाहन अधिनियम व त्या अंतर्गत नियमानुसार कारवाई करण्याची सूचना देण्यात आलेली आहे त्याच्यावर क** कारवाई करण्यात येणार आहे असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे



