खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

खडसे महाविद्यालयात पीएम – उषा अनुदान अंतर्गत भूमिपूजन सोहळा संपन्न

**मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी.जी. महाविद्यालयात दि. 01 सप्टेंबर 2025 रोजी पी.एम. उषा अनुदान अंतर्गत स्मार्ट क्लासरूम-स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकास केंद्राचे भूमिपूजन संपन्न झाले. या केंद्राचे भूमिपूजन मा.ना. रक्षाताई खडसे (केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा.आ. एकनाथराव खडसे (विधान परिषद सदस्य तथा माजी महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य) उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. ॲड. रोहिणीताई खडसे उपस्थित होत्या. मा. ना. रक्षाताई खडसे यांनी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना पीएम- उषा अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून मुक्ताईनगरच्या पंचक्रोशीतील आजी-माजी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास केंद्र व स्मार्ट क्लासरूम मध्ये अध्यापनाची व अध्ययनाची संधी मिळणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच आधुनिक काळातील विद्यार्थ्यांनी माय-भारत पोर्टलच्या माध्यमातून आपले जीवन स्वावलंबी बनवावे तसेच आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करून देश विकसित करावा अशी माफक अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी प्रमुख अतिथी या नात्याने महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री मा.आ‌. एकनाथरावजी खडसे यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत येऊन कुटुंब,समाज आणि राष्ट्र निर्मितीत सहभाग नोंदवावा, असे बहुमोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात मा. ॲड. रोहिणीताई खडसे यांनी राज्य शासन व केंद्र शासन यांचे मनापासून आभार व्यक्त करीत मिळालेले अनुदान हे कौतुकास्पद असून या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून येणाऱ्या काळात विद्यार्थी स्वावलंबी व आत्मनिर्भर बनण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नाची पराकाष्टा करेल असे आश्वासन दिले. याप्रसंगी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. सी. एस. चौधरी तसेच मा.संचालक चंद्रशेखर बढे, पुरुषोत्तम भाऊ महाजन, रमेश खाचणे व प्रा. आर.पी. ब-हाटे यांची विशेष उपस्थिती लाभली. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संजीव साळवे, उपप्राचार्य डॉ. वंदना चौधरी, पीएम-उषाचे सहसमन्वयक डॉ. अतुल वाकोडे, समन्वयक डॉ. अनिल पाटील, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा .डॉ. गणेश चव्हाण तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अतुल बढे व प्रा. विजय डांगे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीएम- उषाचे समन्वयक डॉ.अनिल पाटील यांनी तर प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.संजीव साळवे यांनी केले.याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button