कौ. मनोरमा बाई अशोक कोकाटे यांच्या अस्थिविसर्जन व जलदान विधीचे आयोजन…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
एकलारा बनोदा २८ सप्टेंबर २०२६
एकोलारा बानोदा येथे २९ सप्टेंबर रोजी विधी कोकाटे परिवारावर शोककळा येथील कै. मनोरमा बाई अशोक कोकाटे यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अस्थिविसर्जन व जलदान विधीचे आयोजन करण्यात आले आहे. हा विधी मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता एकलारा बानोदा येथे पार पडणार आहे. कै. मनोरमा बाई कोकाटे यांच्या निधनाने कोकाटे परिवारासह नातेवाईक, आप्तेष्ट व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या प्रेमळ स्वभावाच्या व आपुलकीच्या आठवणींना उजाळा देत परिवाराच्या वतीने अस्थिविसर्जन व जलदान विधी आयोजित करण्यात आला आहे.
या दुःखद प्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांनी उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन कोकाटे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : एकलारा बानोदा
वेळ : सकाळी १० वाजता
शोकाकुल : कोकाटे परिवार…✍️



