देशाच्या स्वातंत्र्यानंतर शेतकरी, शेतमजूर,कामगारांचे, प्रश्न अधिक बिकट !

देशाच्या स्वातंत्र्यानंतर शेतकरी, शेतमजूर,कामगारांचे, प्रश्न अधिक बिकट !स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे संयुक्त मेळाव्यात कॉ.यशवंत झाडे यांचे संबोधन.. प्रतिनिधी :- 5 एप्रिल दिल्ली येथील मजदूर, किसान महामोर्चा निमित्त चांदुर रेल्वे येथील आनंद भवन येथे 12 मार्च रोजी शेतकरी शेतमजूर कामगारांचा संपन्न झालेल्या मेळाव्याला किसान सभेचे किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. यशवंत झाडे यांनी संबोधित केले. त्यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर शेतकरी,शेतमजूर कामगारांची, परिस्थिती अधिक बिकट झालेली आहे.1991 नंतर नवीन जागतिकीकरणाचे आर्थिक धोरणा नंतर शेतकऱ्यान करिता जे काही धोरण घेण्यात आले. ते पूर्वता शेतकरी विरोधी होते. या धोरणाला पर्याय म्हणून 2014 नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवण्यासाठी आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर किसानाच्या परिस्थितीत प्रतिकूल बदल झालेला आहे, शेतीमालाचे प्रचंड भाव वाढले, शेतकरी अजूनही कर्जबाजारी आहे,14 लाखांच्या वर शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. दोन कोटी नौकरीचे आश्वासन सपशेल खोटे ठरले. 15 लाख रुपये जनतेच्या खात्यात अद्यापही जमा झालेले नाही, त्या व्यतिरिक्त देशात धार्मिक उन्माद, झुंडशाही वाढल्याचे दिसते.44 कामगार हिताचे कायदे, त्या कायद्याचे चार कामगार कायद्यात रूपांतर करून या कायद्यामुळे कामगारांना 12 तास कामावर राबविण्याचे धोरण आहे. शुल्लक कारणावरून केव्हाही कामावरून काढण्याचे कामगार कायद्यात स्पष्ट केले आहे. अंगणवाडी प्रकल्प,आशा वर्कर एन. आर. एच. एम या योजना खाजगीकरणात देण्याचे भाजप सरकारचे धोरण दिसत आहेत. हे आर्थिक अरिष्ट असताना दुसऱ्या बाजूला महिला वर्ग सुरक्षित नाही. रोज महिलावर अत्याचार होताना दिसत आहे. सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने भोंदू बाबांचे पीक आलेले आहे. यामध्ये सामान्य जनतेला फसवण्याचे काम केल्या जात आहे. लोकशाहीचे लक्तरे वेशीला टांगून हुकूमशाही पद्धतीने सरकारचा कारभार सुरू आहे. या सर्वांचा विचार करून 5 एप्रिल दिल्ली येथे होणाऱ्या महामोर्चा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या मेळाव्यात प्रमुख भाषणे कॉ. सुभाष पांडे सिटू जिल्हाध्यक्ष, कॉ. रमेश सोनुले अंगणवाडी कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष, कॉ. सुनील देशमुख सिटू,जिल्हा सचिव, कॉ. महादेव गारपवार जिल्हा अध्यक्ष किसान सभा, कॉ. दिलीप शापामोहन शेतमजूर युनियन जिल्हाध्यक्ष, कॉ. श्याम शिंदे किसान सभा जिल्हा सचिव यानी कार्यक्रमाला मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या समारोपय भाषणामध्ये किसान,मजूर, कामगार यांचे प्रश्न अधिक जटील झाले असून हे संघर्षील वेळ आहे. त्यात प्रचंड वाढलेली महागाई हे समजून घेण्याची आव्हान अध्यक्षीय भाषणात कॉ. देविदास राऊत यांनी म्हटले, मंचावर उपस्थित कॉ. संतोष निमकर, कॉ. किशोर शिंदे, कॉ. अंकुश वाघ. कॉ. सुनील बावनकर, कॉ. पद्माताई गजभिये हे मंचावर उपस्थित होते. संयुक्त मेळाव्याचे नियोजन संजय वानखडे, रमेश सोळंके, राजेंद्र कडूकार, गणेश कुंभरे, संतोष मारबदे, रामदास कारमोरे, हरिभाऊ चव्हाण, अशोक गवई, यादवराव न्ननोरे, बंडू गोंडाने, बावणे, सुधाकर राऊत, प्रमोद झाडे, अर्जुन जिभकाटे, हरिभाऊ गोखे, अनिल देशमुख, अनंत देशमुख, सतीश देशमुख, डॉ. खोडके, रामराव सोनटक्के, किसनराव पाटील, रोशन विरूळकर, अरुणा आठवले, राजू नितनवरे, जया मोटघरे, मंदाताई नंदरधने यांनी संयुक्त कामगार मेळावा यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक श्याम शिंदे जिल्हा सचिव किसान सभा यांनी केले.



