बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

कौतुकाची बातमी! माय बापाच्या कष्टाचं पोरांनी चीज केलं गावानं डोक्यावर घेतलं! अंचरवाडीचे तीन शेतकरी पुत्र झाले अग्नीवीर..!!गावकऱ्यांनी काढली जंगी मिरवणूक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

दूर्दम्य इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी आणि प्रयत्नांवर विश्वास असला की अशक्य असं काहीच नसतं… मग संकट कितीही आडवी आली तरी त्या संकटावर मात करता येतेच..
अनचर वाडीच्या तीन शेतकरी पुत्रांनी तेच दाखवून दिलय.. शेतीत अपार कष्ट करणाऱ्या मायबापांच्या कष्टाचं चीज कसं करायचं असतं हे”त्या “तिघांनी दाखवलं.. भारतीय सैन्यात झालेल्या”अग्निवीर”योद्धांच्या भरती त्यांनी बाजी मारली. गणेश तुकाराम इंगळे, स्वराज विष्णू कुऱ्हे आणि ज्ञानेश्वर दीपक गुप्ता अशी या तिघा जिगरबाज तरुणांची नावे आहेत.. त्यांचा आतापर्यंतचा संघर्ष डोळ्यांनी पाहिलेल्या गावकऱ्यांना देखील यांचा चांगलाच आनंद झाला आणि गावकऱ्यांनी जंगी मिरवणूक काढत त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं..
गणेश, स्वराज आणि न्यानेश्वर या तिघांचेही आई-वडील शेती व शेतमजुरी करतात. मोठ्या कष्टातून त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं.. मुलांनीही सैन्य भरतीसाठी खडतर मेहनत केली.. आता या मेहनतीच फळ त्यांना मिळालं. तिघांची ही अग्नी वीर मध्ये निवड झाल्याने देशी सेवा करण्याच त्यांचं स्वप्न साकार होणार आहे.
त्यांच्या या यशाची बातमी करता तिघांच्याही आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. गावकऱ्यांनी गणेश इंगळे आणि शिवराज कुर्हे यांची गावातून मिरवणूक काढली. ज्ञानेश्वर यावेळी परीक्षेसाठी बाहेरगावी असल्याने त्यांचे वडील दीपक गुप्ता या मिरवणुकीत सहभागी होते. लेकरांच्या कौतुकाचा सोहळा पाहून आई-वडील भारावले होते. गणेश, स्वराज आणि न्यानेश्वर ची ही निवड इतर तरुणांसाठी देखील प्रेरणादायी ठरणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button