महाराष्ट्रविदर्भ
कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव च्या तिन्ही प्रवेश द्वाराला महापुरुषाचे नाव देण्या करिता संचालक नागेश बळी यांचे निवेदन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम /मालेगाव :- येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील प्रवेश द्वाराला कित्येक वर्ष झाली कोणतीही नाव नाही आहे.संचालक नागेश बळी यांच्या निर्दनास आले व त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती ला महापुरुषाचे नाव असायला पाहिजे करिता .कु.उ.बा समिती चे सचिव यांना संचालक नागेश बळी यांनी निवेदन दिले.निवेदनात असे म्हटले आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेश द्वार क्र.१ ला छत्रपती शिवाजी महाराज , प्रवेश द्वार क्र.२ ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रवेश द्वार क्र ३ ला महात्मा जोतिबा फुले हे देण्यात यावे असे निवेदनात सुचवले आहे. यावेळी संचालक नागेश बळी,संतोष भाऊ गवळी, गोपाल गवळी,तुषार मांडे,गोपाल इंगळे,सोनू सोभागे,समाधान सोभागे, देवराज सोभागे हे उपस्थित होते.



