कुणबी समाज महीला मंडळाचा स्तुत्य ऊपक्रम

तेल्हारा प्रतीनीधी..
दी.०६/०३/२०२६ शनिवार
तेल्हारा तालुका कुणबी समाज महीला मंडळाच्या वतीने वेळोवेळी विवीध समाज ऊपयोगी तथा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होत असते,
अशातच जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज बिजोत्सव निमित्ताचे औचित्य साधुन तेल्हारा कुणबी समाज महीला संघटनेच्या वतिने दहीगांव येथील वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील निराधार वृद्ध महीला व पुरुषांना साळी,चोळी,लुगडे,कपडे,दुपट्टे टोपीचे तथा आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या खाऊचे वाटप तथा वृक्षारोपण करण्यात आले,
तसेच ऊपस्थीत महीला मंडळाच्या महीलांसोबत वृद्धाश्रमातील मातांनी यथेच्छ वार्तालाप करत प्रसन्नता व्यक्त केली,
यावेळी तेल्हारा संघटनेच्या तालुका अध्यक्ष सुमनताई कोठे, तेल्हारा शहर अध्यक्ष तथा माजी सभापती आरती गायकवाड, संघटनेच्या सदस्या नगरसेवीका रुपाली हागे,वनमाला खोटरे,मालुबाई वाकोडे,संगीता कोरडे,स्मिता दबडघाव, वैशाली तिव्हाणे,संगीता महाल्ले, मनीषा दबडघाव, शारदा भोंगळ, सुवर्णा तिव्हाणे, जयश्री घंगाळ यांची ऊपस्थीती होती,
खरी ईश्वर सेवा ही रंजल्या गांजल्याची सेवा करण्यातच आहे असा उपदेश जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केला होता त्याचप्रमाणे आर्तभूता द्यावे दान खरे पुण्य तया नामे अशी त्यांची शिकवण होती. त्यांच्या उपदेशाचे व शिकवणुकीचे आम्ही पालन करत असल्याचे प्रतिपादन कुणबी समाज महिला मंडळाच्या सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केले.



