जळगावा जिल्हाजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुबई

महागाईविरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन पोलिसांकडून रोखले; “आवाज दाबला तरी संघर्ष सुरूच राहणार”

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा एल्गार; आंदोलन रोखल्याने सरकारवर टीकेची झोड

वाशी, प्रतिनिधी : वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने वाशी येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. मात्र हे आंदोलन पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे रोखण्यात आल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

“जुल्मी जब जब जुल्म करेगा, सत्ता की गलियारों से… चप्पा-चप्पा गूंज उठेगा, इन्कलाब के नारे से” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात संताप व्यक्त केला.

पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत असून भाजीपाल्याच्या दरांनीही उच्चांक गाठला आहे. त्यामुळे गृहिणींसह सर्वसामान्य नागरिकांचे मासिक अर्थकारण कोलमडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. देशभरातील नागरिक महागाईची झळ सोसत असताना त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

मात्र सरकारविरोधात आवाज उठविणाऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी पोलिस कारवाईचा निषेध केला. “सरकारला विरोध सहन होत नसल्याने पोलिसांना पुढे करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र लोकशाहीत जनतेचा आवाज दाबून ठेवता येणार नाही,” अशी भूमिका पक्षाच्या नेत्यांनी मांडली.

“आमचा आवाज कितीही दाबण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत राहू. वाढती महागाई, बेरोजगारी आणि जनविरोधी धोरणांविरोधात लढा अधिक तीव्र केला जाईल. सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पाडत जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरत राहू,” असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.

या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस बंदोबस्तात आंदोलनकर्त्यांना रोखण्यात आले असून या घटनेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button