काही चिंता करू नका, अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत… रविकांत तूपकरांचा मनोज जरांगे ना फोन; जरांगेची भेट घेऊन दिले समर्थनाचे पत्र

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रति निधी
उषा इंगळे बुलढाणा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे ना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. काही चिंता करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. प्रकृती अवस्थेमुळे तुम्हाला भेटायला येता आले नाही, मात्र आजारातून बरे झाल्यावर तुम्हाला भेटायला येतो असे तुकर मनोर जरांगे यांना म्हणाले. दरम्यान काल, सायंकाळी रविकांत तुपकर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन समर्थनाचे पत्र जरांगे यांना दिले. गेल्या आठ दिवसापासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. कालपासून त्यांनी उपोषण आणखी तीव्र केले असून आता पाण्याच्याही त्याग केला आहे. रविकांत तुपकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे जरांगे यांची भेट घेऊ शकले नाहीत, मात्र जरांगे यांना फोन करून तुपकर यांनी पाठिंबा दर्शविला. शिवाय रविकांत तुपकर यांच्या पाठिंबाचे पत्र ॲड शर्वरी चक्कर यांनी अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे यांना दिले.”मराठा आंदोलकांवर झालेल्या गाठी चार्ज हा सर्वतोपरी निंदनीय आहे. मराठा आरक्षण हा समाजाच्या अस्मितेचा प्रश्न असून त्याकरता कितीही मोठा लढा द्यावा लागला तरी तो आपण देऊ.. मनोज भाऊंच्या या संग्रामाला आमचा सक्रिय आहे”असे रेविकांत तुपकर यांनी मनोजरांगे यांना दिलेल्या पाठिंबाचा पत्रात.



