कालवडसह पूर्णा व मस नदी काठच्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा

कालवडसह पूर्णा व मस नदी काठच्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा – आमदार ॲड.आकाश फुंडकर
कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भास्तन,कठोरा, कालवड, यासह मस व पूर्णा नदीकाठच्या गावांना पुराचे पाणी येऊन टेकले आहे. या गावातील नागरिकांना तत्काळ सुरक्षित स्थळी हलविण्याची सूचना आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी तहसीलदार यांना केली.
स्टार भारत लाईव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
काल पासून विदर्भात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे मस आणि पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. अनेक गावांना पुराचा विळखा पडला आहे. याची माहिती मिळताच आमदार ॲड. आकाश फुंडकर हे आज पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेले. सतत पडत असलेल्या पावसामुळे पूर्णा व मस नदीला प्रचंड प्रमाणात मोठा पूर आला असल्यामुळे पुराचे पाणी कालवड गावाला टेकले आहे. पुरपातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येउ शकत नाही. यासाठी कालवड या गावात जाऊन तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याबाबत सूचना श्री सोनवणे तहसीलदार शेगाव यांना दिल्या. तसेच आजूबाजूच्या सर्व शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे शेतीतील पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे त्याचे सुद्धा तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना सुद्धा आमदार आकाश फुंडकर यांनी दिल्या. रस्त्या लागत ज्या शेतांमध्ये पाणी साचले आहे त्यामधील पाणी काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना केल्या आहेत, यावेळी तहसीलदार शेगाव, गट विकास अधिकारी शेगाव, गोविंदराव मिरगे तिन्ही गावातील समस्त नागरिक उपस्थित होते



