चिखली नगरपालिकेच्या अवाजवी मालमत्ता कर वढिविरोधातविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; घोषणाबाजी करत नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
चिखली, दि. १९ (शुक्रवार) : चिखली नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या अवाजवी मालमत्ता कर वाढीविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नगर परिषद कार्यालयात जोरदार आंदोलन केले. यावेळी “अवाजवी कर वाढ रद्द करा”, “जनतेवरील अन्याय बंद करा”, “चिखलीकरांना न्याय द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनकर्त्यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून मालमत्ता कर वाढीचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. निवेदनात करण्यात आलेली कर वाढ ही सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, लघु व्यावसायिक, नोकरदार, मजूर वर्ग तसेच घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच कर आकारणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीच्या कामकाजाची चौकशी करून संबंधित एजन्सीचे काम रद्द करावे, अशीही मागणी करण्यात आली.
हे आंदोलन काँग्रेसचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते डॉ. मोहम्मद इसरार अब्दुल जब्बार आणि काँग्रेस गटनेते प्रा. निलेश गावंडे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली पार पडले.
निवेदनावर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेख झाकीर, यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मोहमद आसिफ मो. शरीफ, सौ. मीनलताई गावंडे, श्रीमती सुनीता प्रकाश शिंगणे, सौ. सीमाताई गोपाल देव्हडे, सौ. शीतल संतोष देशमुख, श्री. उबेद अली खान, सौ. संध्याताई आनंद बोन्द्रे, श्री. रत्नदीप यशवंत शिंगारे, सौ. स्वाती अमोल लहाने, सौ. सरस्वतीताई पुरुषोत्तम वायाळ, सौ. सुप्रिया प्रशांत भटकर, डॉ. प्रकाश शिंगणे या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांसह श्री. गोपाल



