जाफ्राबाद -जालना मार्गावर टाटा इंडिगो कारचा भीषण अपघात; तिघे जखमी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :- प्रशांत चव्हाण
बुलढाणा :- (४जून ) जाफ्राबाद जालना रस्त्यावरील हिंदुस्तान वॉटर पार्क जवळ गुरुवारी टाटा इंडिगो कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेच्या खाली उतरून थेट शेतात आदळली.
यावेळी वाहनाने तीन ते चार पलट्या घेतल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघाताची तीव्रता मोठी असतानाही यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कार मधे बसलेले तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा इंडिगो कार ही तेलंगणा राज्यातील नोंदणीची असून त्यामधले तीन प्रवासी हे सुद्धा तेलंगणा राज्यातले आहेत. ते देऊळगाव राजा येथून भोकरदन कडे कामानिमित्त जात असताना हा अपघात घडला.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. अपघातामुळे परिसरात काही काळ गर्दी झाली होती. पुढील तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे



