अशोक नगर प्रभाग 3 मधील शासकीय रस्ता फोडून अतिक्रमण करणाऱ्या वर कार्यवाही ची मागणी

नगरपंचायतला दिले निवेदन
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – मालेगाव शहरातील अशोक नगर प्रभाग तीन येथे शासनाच्या निधीतून बनलेल्या गट्टू रस्ता फोडून त्यावर अतिक्रमण करण्याच्या व्यक्तीचे नावे दिपक पखाले, अतिश पखाले, निलेश पखाले, आकाश पखाले या व्यक्ती वर कारवाई करून रस्ता येण्या जाण्याचा मोकळा करावा म्हणून 22 ऑक्टोंबर दुपारी दोन वाजता नगरपंचायत मुख्यधिकारी यांना दिले निवेदन
22 ऑक्टोंबर दुपारी दोन वाजता नगरपंचायत मालेगाव येथे दिलेल्या निवेदनात अशोक नगर प्रभाग तीन मधील येण्या जाण्याचा शासनाने बनवलेल्या रस्त्यावरील गट्टू लंपास करून तो चाळीस वर्षापासून लोक येजा करणाच्या रस्त्यावर अतिक्रमण करून संपूर्ण रस्ता बंद केला आहे त्यामुळे नगरपंचायतने त्वरित कारवाई करून शासनाचा रस्ता हडप करणाऱ्या चार व्यक्तीवर नगरपंचायत बांधकाम विभाग आधी नियमानुसार त्वरित कार्यवाई करण्याची मागणी निवेदन कर्ते चंद्रकांत गायकवाड यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना दिले निवेदन. तसेच ह्या अतिक्रमण चालू असल्याबाबत सी.ओ नगरपंचायत यांना भ्रमणध्वनी वरून माहिती देण्यात आली होती.



