महाराष्ट्रसामाजिक

भालोद येथील शाळेने जतन केलेली बाबासाहेबांची स्मृती नव्या पिढीस प्रेरणा देत राहील : जयसिंग वाघ

भालोद :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टार्ट समितीचे सभासद असताना दिनांक २२ ऑक्टोबर १९२९ रोजी भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल ला भेट देऊन तसा शेरा लिहिलेला आहे . बाबासाहेबांनी लिहिलेला तो शेरा सदर संस्थेने जतन करून ठेवला आहे . बाबासाहेबांची ती भेट एक ऐतिहासिक तसेच शासकीय बाब असल्याने तो शेरा पुढील पिढीस नक्कीच प्रेरणा देत राहील असे विचार प्रसिध्द साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.
बाबासाहेबांच्या भालोद भेटीचे औचित्य साधून वाघ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल ला भेट दिली , बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले व सदर भेटी विषयीची माहिती दिली .
जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात पुढं सांगितले की , बाबासाहेब मुंबई प्रांतातील अस्पृश्य व आदिवासी समाजाच्या सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक विकासाचा अभ्यास करून त्यांच्या विकासार्थ ब्रिटिश सरकारला आवश्यक उपाय योजना सुचविण्या करिता स्टार्ट समितीच्या माध्यमातून या गावी आले होते . या भेटीत त्यांनी अस्पृश्य समाजातील मुलांना शिक्षण घेणे कसे अनिवार्य आहे या बाबत मार्गदर्शन केले आहे . शिक्षणाचा मूलमंत्र आपण प्रत्यक्षात आणून बाबासाहेबांचे स्वप्न साकार करावे असेही वाघ यांनी स्पष्ट केले.
प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सपकाळे यांनी सांगितले की बाबासाहेब एवढ्या ग्रामीण भागात येवून आपल्याशी संवाद साधत होते , मार्गदर्शन करीत होते या वरून बाबासाहेबांना आपल्या विषयी केवढी तळमळ होती हे दिसून येते .
मुख्याध्यापक डी. व्ही. चौधरी यांनी सांगितले की पाच वर्षांनी बाबासाहेबांच्या या ऐतिहासिक भेटीस १०० वर्षे पूर्ण होतील तेंव्हा या संबंधाने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल . बाबासाहेबांचा हा शेरा आमच्या संस्थेस नेहमीच नवी ऊर्जा देत आला आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदन तायडे यांनी तर आभारप्रदर्शन डी. एस. सुरवाडे यांनी केले . सामाजिक कार्यकर्ते समाधान सुरवाडे , व्यवस्थापक शांताराम भालेराव , पर्यवेक्षक आर. एस. जावळे , एस. एम. तायडे , पंकज वानखेडे आदींसह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्यासंख्येने हजर होते .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button