महाराष्ट्रविदर्भ

श्री दर्शनार्थ दोन दिवस मंदिर रात्रभर खुले…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगांव | श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांवच्या वतीने राम नवमी उत्सवाकरिता श्रींचे मंदिर दर्शनसाठी दोन दिवस खुले राहणार आहे. यामुळे भाविक भक्तांना श्रींच्या समाधी मंदिराचे दर्शन घेता येणार आहे. श्रीं रामनवमी उत्सवानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. भजनी दिंड्यांमधील वारकरी भाविकांनी श्रींच्या समाधी मंदिराचे दर्शनासाठी दि. २५ व २६ मार्च रोजी श्रींच्या दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. त्यामुळे रात्री येणाऱ्या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन, महाप्रसाद घेऊन आपल्या गावी परत जाता येणार आहे, तरी श्रींच्या भावीकभक्तांनी यांचा लाभ घ्यावा. दि.२३ मार्च सोमवार चैत्र शु. ५ रोजी श्रीराम नवमी उत्सवानिमित्त ब्राह्मण वृंदांच्या मंत्रोपचारात अध्यात्म रामायण स्वाहाकारास यागास शुभारंभ सकाळी ११ वाजता भक्तिमय वातावरणात करण्यात आला आहे. यागाचे पूजन वेदमूर्ती ब्राह्मण वृंदाद्वारे करण्यात आले आहे. चैत्र शु. ९ गुरुवार दि.२६ मार्च श्री रामनवमी दिनी सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहुती व अवभृतस्नान होणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button