बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

संत गजानन महाराजांच्या पालखीचे उद्या पंढरपूरकडे प्रस्थान

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव, २० जून
प्रतिवर्षप्रमाणे यावर्षीसुद्धा श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारीकरिता संतनगरी शेगाव येथून संत गजानन महाराजांची पालखी उद्या २१ जून रोजी प्रस्थान करणार आहे. यंदाचे पायीवारीचे ५७ वे वर्ष आहे.
गजानन श्रीसंत महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे पायी वारीकरिता ज्येष्ठ शु. ७ अर्थात २१ जून रविवार रोजी सकाळी ७ वाजता श्री मंदिरातून प्रस्थान होईल.
श्रींच्या पालखीचा मार्ग २१ जून रोजी दुपारी श्रीक्षेत्र नागझरी, रात्री पारस, २२ जून रोजी गायगाव, रात्री भौरद, २३ जून रोजी अकोला, रात्री अकोला, २४ जून रोजी अकोला, रात्री अकोला, २५ जून रोजी भरतपूर, रात्री वाडेगाव, २६ जून रोजी देऊळगाव बाभूळगाव, रात्री पातूर, २७ जून रोजी मेडशी, रात्री डव्हा, २८ जून रोजी मालेगाव, रात्री शिरपूर येथे मुक्काम राहील.
२९ जून रोजी चिंचला बेन, रात्री म्हसला बेन, ३० जून रोजी किनखेडा, रात्री रिसोड, १ जुलै रोजी पानकान्हेरगाव, रात्री सेनगाव, २ जुलै रोजी श्रीक्षेत्र नरसि नामदेव, रात्री डिग्रस, ३ जुलै रोजी श्रीक्षेत्र औंढा नागनाथ, रात्री जवळाबाजार, ४ जुलै रोजी अडगाव रजोबा हट्टा, रात्री श्रीक्षेत्र त्रिधारा, ५ जुलै रोजी परभणी, रात्री परभणी, ६ जुलै
रोजी ब्राह्मणगाव, रात्री दैठणा येथे पालखी राहील.
७ जुलै रोजी खळी, रात्री गंगाखेड, ८ जुलै रोजी वडगाव दादाहरी, रात्री परळी थमेळ, ९ जुलै रोजी परळी वैजनाथ, रात्री परळी वैजनाथ, १० जुलै रोजी कान्हेरीवाडी, रात्री अंबेजोगाई, ११ जुलै रोजी लोखंडी सावरगाव, रात्री बोरी सावरगाव, १२ जुलै रोजी गोटेगाव, रात्री कळंब, १३ जुलै रोजी गोविंदपुर, रात्री तेरणा साखर कारखाना तर १४ जुलै रोजी किनी, रात्री उमाळा, १५ जुलै रोजी धाराशिव, रात्री धाराशिव, १६ जुलै रोजी वडगाव सिद्धेश्वर, रात्री तुळजापूर येथे पालखीचा मुक्काम राहील. १७जुलै रोजी सांगवी, रात्री उळे, १८ जुलै रोजी सोलापूर, रात्री सोलापूर, १९ जुलै रोजी सोलापूर, रात्री सोलापूर, २० जुलै रोजी सोलापूर, रात्री तिरहे, २१ जुलै रोजी कामती खु.. रात्री मचणुर, २२ जुलै रोजी ब्रह्मपुरी, रात्री श्रीक्षेत्र मंगळवेढा, २३ जुलै रोजी मंगळवेढा, रात्री श्रीक्षेत्र पंढरपुर आणि २३ ते २७ जुलैपर्यंत श्रीक्षेत्र पंढरपुर येथे मुक्काम राहील

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button