जळगावा जिल्हाजाहिरातबुलढाणाराजकीय

ऐतिहासिक क्षण! शेगाव नगरीत उत्साहाचे वातावरण; राष्ट्रपतीच्या स्वागतासाठी नागरिकांची मोठी गर्दी….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू हे आज शेगाव ”आयुष राष्ट्रीय आरोग्य शिबिरा” (National Arogya Fair 2026) च्या उद्घाटनासाठी आगमन झाले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले राष्ट्रपतीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत. या मेळ्यात आयुर्वेद, योग, होमिओपॅथिक, युनानी यासारख्या विविध आयुष पद्धतीच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी सल्ला व औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आरोग्य जनजागृती आणि पारंपारिक वैद्यकीय पद्धतीचा प्रसार हा या मेळ्याचा मुख्य उद्देश आहे. शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली होती ठीक ठिकाणी स्वागत कमानी,बॅनर, तसेच आकर्षण सजावट करण्यात आली होती. राष्ट्रपती महोदयांनी कार्यक्रमास्थळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना निरोगी भारत घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायचे आवाहन केले. त्यांनी शेगावच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे कौतुक केले. राष्ट्रपतींनी नागरिकांना सांगितले की देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण, महिला सक्षमीकरण, आणि सामाजिक एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले. शेगाव सारख्या सांस्कृतिक व धार्मिक वारसा असलेल्या शहराला भेट देताना त्यांना विशेष आनंद झाल्याची त्यांनी नमूद केले. उद्घाटन प्रसंगी त्यांनी निरोगी भारतासाठी पारंपारिक वैद्यकीय पद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आणि निरोगी जीवनशैली अंगीकरणाचे आव्हान त्यांनी नागरिकांना केले.दौऱ्या दरम्यान राष्ट्रपतींनी (Sant Gajanan Maharaj Temple) येथे जाऊन दर्शन घेतले. कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींनी विविध मान्यवरांची संवाद साधला. या ऐतिहासिक भेटीमुळे शेगाव शहराचे महत्त्व आणखी अधोरेखित झाले असून नागरिकांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे….✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button