महाराष्ट्र

एमआयडीसी श्रीरामपूरचा आर्थिक कणाउद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार – आ. हेमंत ओगले प्रतिनिधी दत्तात्रय जोगदंड राहुरी..

श्रीरामपूर – एमआयडीसी मधील प्रश्न बाबत आपण गंभीर असून मोठे उद्योग श्रीरामपूरत कसे येतील यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले.
एमआयडीसीतील कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी आमदार ओगले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा विजेचा आहे. २२० केव्हीचे उच्च दाब स्टेशनचे काम लवकरच चालू होणार असून यासाठी आपण महापारेषण चे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांची देखील मुंबई येथे भेट घेतली आहे तसेच फायर स्टेशनच्या प्रस्तावाला देखील लवकरच मंजुरी मिळेल. एमआयडीसी मधील होणाऱ्या चोऱ्या आणि गुन्हेगारीकडे देखील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले यासाठी एमआयडीसी परिसरात सीसीटीव्ही लावण्याचे सूचना देखील केल्या तसेच अनेक वर्षांपूर्वी बसविलेले पथदिवे देखील बदलण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे अधिकाऱ्यांना आदेशित केले.
यावेळी युवा नेते करण ससाणे म्हणाले की, अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात करत श्रीरामपूर एमआयडीसीतील उद्योजकांनी आपला उद्योग सांभाळत अनेकांना रोजगार निर्मिती करून दिली आहे, उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार हेमंत ओगले यांनी लक्ष घातले, आमदार उगले हे पहिल्या दिवसापासूनच एमआयडीसी मध्ये मोठे उद्योग कसे येतील यासाठी प्रयत्नशील असल्याचे ससाणे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससाणे तसेच यापूर्वीच्या अनेक लोकप्रतिनिधींनी एमआयडीसी वाढीसाठी विशेष प्रयत्न केले. विज, पाणी, रस्ते, सुरक्षता अशा मूलभूत सोयींकडे अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यास निश्चितच येणाऱ्या काळात श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये नवीन उद्योगधंदे येतील जेणेकरून श्रीरामपूरच्या बाजारपेठेला चालना मिळेल असे म्हटले.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे यांनी देखील एमआयडीसीच्या प्रश्नांकडे आमदार ओगले व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, सेवादल काँग्रेसचे, प्रमुख रावसाहेब आल्हाट यांच्यासह एमआयडीसीचे सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक श्री टेकाळे, सहाय्यक व्यवस्थापक श्री. सोनटक्के उपअभियंता श्री. बडगे, उपअभियंता श्री. थोटे, महावितरणचे श्री.माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मगरे उपस्थित होते.
यावेळी एमआयडीसी मधील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button