
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद
जळगाव जामोद तालुक्यातील पडशी सुपो येथे एका 21 वर्षीय तरुणीचा मानसिक छड करून तिला लग्नासाठी धमकावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीच्या सततच्या जाचाला कंटाळून आणि होणारे लग्न तुटल्याच्या धक्क्याने तरुणीने मृत्यूला कवटाळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पळशी सुपो येथील आरोपी गौरव पुरुषोत्तम खंडारे वय वर्ष 22 हा गेल्या काही दिवसापासून या तरुणीला त्रास देत होता. तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझे आणि माझे फोटो तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवून देईन अशी धमकी तो वारंवार देत होता. या धमक्यामुळे तरुणीच्या आयुष्यात वादळ निर्माण झाले. ज्या गोष्टीची भीती होती तेच घडले. आरोपीच्या कृत्यामुळे तरुणीचे ठरलेले लग्न सासरच्या मंडळींनी मोडले शनिवार
4 एप्रिल रोजी सासरची मंडळी घरी आली आणि संबंध मोडल्याची स्पष्ट केले. भरल्या दारातून लग्नाचे पाऊल मागे पडल्याने आणि आरोपी गौरव खंडारे याच्या होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासामुळे तरुणी फार खचून गेली.
समाजात होणारी बदनामी आणि आरोपीचा छळ असाह्य झाल्याने तिने राहत्या घरी तिने आपली जीवनयात्रा संपविली. ऐन तारुण्यात एका मुलीने अशाप्रकारे जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी मृतक तरुणीचे काका ज्ञानेश्वर शामराव कोकाटे वय 47 यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गौरव पुरुषोत्तम खंडारे त याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 108 आणि 351(2)अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशन चे ठाणेदार नितीन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास करत आहेत.



