खानदेशजळगावा जिल्हानिवडणूक

उबाठा शिवसेनेचे नेते संजय राऊत उद्या पाचोऱ्यात

पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

रवी भालेराव:

उबाठा शिवसेनेचे नेते संजय राऊत हे गुरुवारी, २२ ऑगस्ट रोजी पाचोरा येथे येत आहे. ते पाचोरा विधानसभा मतदार संघातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे भारत डेअरी येथुन सकाळी ९ वाजता शहरात आगमन होणार आहे. तेथुन बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. बाईक रॅली जामनेर रोडमार्गे शिवसेना कार्यालयाजवळ येणार आहे. तेथे स्वागत व शिवध्वजारोहण होणार आहे.

शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांचे व प्रतिमांचे पूजन केल्यानंतर भुयारी मार्गे, भडगाव रोड, राजे संभाजी चौक, महाराणा प्रताप चौकमार्गे शहरातील अटल मैदानावर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

मेळाव्याला संपर्क प्रमुख संजय सावंत, वैशाली सूर्यवंशी व जिल्ह्यातील उबाठा सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात मतदार संघातील सर्व शिवसैनिक, शिवसेनेवर निष्ठा ठेवणाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे अावाहन वैशाली सूर्यवंशी यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button