बुलढाणाविदर्भ

ग्रामपंचायत सदस्यांचाच ; शोले स्टाईल पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन जलजीवन मिशनवर घणाघात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

देऊळगाव राजा | प्रतिनिधी. शंकर शिवरकर

देऊळगाव मही येथील केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेतील रखडलेल्या व निकृष्ट दर्जाच्या कामावर आता चक्क ग्रामपंचायत सदस्यांनीच गंभीर आक्षेप घेतला असून, संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करत सात दिवसांत काम सुरू न झाल्यास पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता .
ग्रामपंचायत सदस्य संदीप विजय राजपूत आणि अनंता नारायण इंगळे यांनी उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, देऊळगाव राजा यांना दिलेल्या निवेदनात अनेक गंभीर आरोप केले आहेत.
निवेदनानुसार, सुमारे 5 कोटी रुपयांच्या जलजीवन मिशन योजनेचे काम गेल्या पाच वर्षांपासून संथ गतीने सुरू असून, ठेकेदार मनमानी पद्धतीने कधी काम सुरू तर कधी बंद ठेवत आहे. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गावातील नागरिकांना अद्याप नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतः पाहणी करून सुमारे एक किलोमीटर पाइपलाइनच टाकण्यात आल्याचे निदर्शनास आणले असून, अजूनही मोठ्या प्रमाणावर काम बाकी असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, काम अपूर्ण असतानाही बिले काढल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, सात दिवसांच्या आत बंद पडलेले काम पुन्हा सुरू करून दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे. त्या अनुषंगाने आज २९ जून २०२६ रोजी पाण्याच्या टाकीवर चढून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले,
ग्रामपंचायत सदस्यांनीच आपल्या गावातील विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने जलजीवन मिशनच्या कामकाजावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आता प्रशासन व संबंधित विभाग या तक्रारीची कितपत दखल घेतात आणि रखडलेल्या योजनेला गती देतात, याकडे देऊळगाव महीकरांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाच्या महिला कनिष्ठ अभियंता श्रद्धा बनकर, कनिष्ठ अभियंता आकाश कचरे आणि भूषणकुमार आडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण राहिलेले काम 2 जुलैपासून सुरू करून फिल्टर प्लॅन्ट टाकीपासून शहरातील वेशीपर्यंत 5.5 किमी पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात येईल, तसेच पाणीपुरवठा वितरणातील त्रुटी दूर करून व्यवस्था सुरळीत केली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले.

यावेळी सरपंच वसुदेव पाटील, ग्रामविकास अधिकारी वसंतराव चेके, शेख जुल्फेकार, माजी सरपंच रामा म्हस्के यांच्यासह ग्रामस्थ व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button