गुन्हेगारीजळगावा जिल्हा

धक्कादायक : रात्रीच्या सुमारास मुलीचे तोंड दाबून अपहरण करण्याचा प्रयत्न

जळगाव स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

| ६ जुलै २०२४जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बारा वर्षीय मुलीला रात्री झोपेत असताना अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र जवळच तिची आई देखील झोपलेली होती, मुलीने त्याचवेळी आईच्या साडीचा पदर ओढल्याने आईला जाग आली. याप्रकरणी परप्रांतीय व्यक्तीवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील आर्वी येथे ४ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास १२ वर्षीय मुलगी कुटुंबातील सदस्यां सोबत झोपलेली होती. झोपेत असलेल्या बारा वर्षीय मुलीचे तोंड दाबून तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संशयित आरोपी विनोदकुमार बच्छावसिंग पटेल (वय ३७, सेक्टर- ६ टकहीया पहाडी वॉर्ड- १५ परसोइ ओझर, सोनभद्र, उत्तर प्रदेश) याने तिला उचलून नेण्याचा प्रयत्न करीत असताना मुलीने शेजारी झोपलेल्या आईच्या साडीचा पदर ओढला व आईला जाग आली.आईने आरडाओरड करताच संशयित आरोपीने तेथून पळ काढला. संशयिताचा मुलीच्या नातेवाइकांनी शोध घेतला, परंतु तो आढळून आला नाही. घटनेची खबर पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळताच त्यांनीही तपासाचे चक्र गतिमान करत त्याचा शोध घेतला. आरोपीला ताब्यात घेत पाचोरा पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चौधरी करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button