उठा पांडुरंगा : मुक्ताईनगरमध्ये भक्तिमय वातावरणात काकड आरती सोहळा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगर
“उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा | झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ||” या संतांच्या अभंगातून मुक्ताईनगर येथील महादेव मंदिरात दररोज भल्या पहाटे काकड आरतीची भक्तिमय वातावरणत सुरु होते. पुरुष, महिला, ज्येष्ठ आणि बालमंडळी आनंदाने या काकड आरतीत सहभागी होत आहेत. भाविकांच्या सहभागामुळे मंदिर परिसर भक्तिरसात नाहून निघत आहे आणि या काकडा आरतीमुळे शहरी भागात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यासह अन्य भागांतील असंख्य वारकरी व भाविकांसाठी असलेले येथील महादेव मंदिर हे श्रद्धास्थान आहे. श्री संत मुक्ताबाईंच्या संत परंपरेला साजेशा स्वरूपात येथे कोजागिरी पौर्णिमेपासून ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत दररोज पहाटे पाच वाजता काकड आरती होते. संतांचे अभंग आळवीत “भल्या पहाटे उठा जागे व्हारे आता | स्मरण करा पंढरीनाथा ||” या अभंगांनी समाजाला जागं करण्याचा, चैतन्य निर्माण करण्याचा उद्देश साधला जातो.
वास्तविक, आषाढी एकादशीपासून ते अश्विन पौर्णिमा पर्यंत देवशयनी असलेल्या श्री पांडुरंगाच्या जागरासाठी काकड आरतीच्या माध्यमातून भक्तांची भावनिक उर्मी जागवली जाते. अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा हा कालावधी विशेष मानला जातो आणि भक्तिभावाने संपन्न होणारा हा उत्सव भाविकांसाठी अलौकिक अनुभव ठरत आहे
हजारो भाविकांना एकत्र आणून सामूहिक भक्तिभावाचा अनुभव देणाऱ्या मुक्ताईनगर शहराततील या काकड आरती सोहळ्याचे महत्त्व अनन्यसाधारण ठरले आहे. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती असे महत्व या काकडा आरती चे आहे ब्रह्म मुहूर्तावर उठून देवाला जागे करण्याचे भाग्य या वारकऱ्यांना प्राप्त होते व या अध्यात्मिक ऊर्जेने वारकरी आनंदाने पाऊल्या खेळत अभंग गातात. यामुळे शारीरिक व मानसिक प्रसन्नता प्राप्त होते. मुक्ताईनगर शहरातील जिजाऊ नगर, निवृत्ती नगर, रेणुका नगर, अष्टविनायक कॉलनी या परिसरातील अनेक वारकरी यामध्ये सहभागी झाले आहेत त्यामध्ये ह. भ. प. भाऊराव महाराज पाटील सर सेवानिवृत्त प्राचार्य यांच्या मार्गदरशनाखाली सुधाकर बोरे, लखन महाराज, राहुल दाभाडे, राजू पाटील, बंडू भोई, विठ्ठल दुट्टे, गणेश गोसावी, गजू महाराज, रघुनाथ शेवाळे, योगेश कोळी, पिंटू पाटील, संतोष महाराज, राजू शेळके इत्यादी वारकऱ्यांचा सहभाग असतो. या काकडा आरतीची सांगता दि.15/11/2024 रोज शुक्रवारला होईल या दिवशी महाप्रसाद व रात्री 8 ते 10 ह. भ. प भाऊराव महाराज पाटील सर सेवानिवृत्त प्राचार्य मुक्ताईनगर यांचे कीर्तन होईल.



